Thursday, 29 November 2018

विधानपरिषद इतर कामकाज : बनावट कीटक नाशके साहित्य बनविणाऱ्या विक्री करणाऱ्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही सुरु - सदाभाऊ खोत


मुंबईदि. 29 : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीटक नाशके व साहित्य बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य वजाहत मिर्झा यांनी मांडली होती. त्यावेळी श्री.खोत बोलत होते.
श्री. खोत म्हणालेयवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आढळून आलेल्या गंभीर उणिवा व त्रुटींच्या अनुषंगाने त्यांचा बियाणेरासायनिक खते व कीटकनाशके विक्रीचा परवाना दि.5.11.2018 पासून परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीयवतमाळ यांनी रद्द केलेला आहे.
तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दराने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हास्तरावर 1 व तालुकास्तरावर 16 अशा एकूण 17 भरारी पथके व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशके विक्री केंद्रे तपासणीमध्ये आढळून आलेल्या उणिवा व त्रुटींचे  अनुषंगाने 86 प्रकरणात विक्री बंद आदेश देण्यात आलेले असून 17 कृषी सेवा विक्री केंद्राचे परवाने रद्द/निलंबित करण्यात आले आहेत. तसेच गुणनियंत्रक निरिक्षकांमार्फत व भरारी पथकामार्फत यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजीयवतमाळराळेगावकळंबपांढरकवडा आणि नेर या तालुक्यामध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करुन व धाडी टाकून कार्यवाही करण्यात आलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारणाकरिता टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
००००



No comments:

Post a Comment