रेसिलीयन्ट हेल्थ
केअर अँड एज्युकेशन सिस्टीमवर चौथ्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेत चर्चा
मुंबई, दि. 30 : आपत्ती
ओढवल्यानंतर जनजीवन विस्कळीत होते. आपत्तीमुळे आर्थिक, सामाजिक आणि
शैक्षणिक नुकसान होते. अशा वेळी आपत्तीग्रस्ताला शोधणे, आपत्तीवर
प्रतिबंध करणे आणि योग्य वेळी आपत्तीवर प्रतिसाद देणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे
प्रमुख काम असल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी सदस्य डॉ.
मुझफर अहमद यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने
आयआयटी पवई येथे 'चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदे’त ‘रेसिलीयन्ट
हेल्थ केअर अँड एज्युकेशन सिस्टीम’ याविषयावरील चर्चासत्र
दीक्षांत सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात राष्ट्रीय आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी सदस्य डॉ. मुझफर अहमद, बिहारच्या
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. यु. के. मिश्रा, युनिसेफचे इर्मजन्सी प्रोग्रामिंग हेड लार्स बर्न्ड, डब्ल्यू. एच. ओ. या स्वयंसेवी संस्थेच्या दक्षिण एशियासाठी काम करणारे डॉ.
निलेश बुध्दा यांनी भाग घेतला.
डॉ. अहमद यावेळी म्हणाले, आपत्ती
ओढवल्यानंतर आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था ढेपाळण्याची शक्यता निर्माण होते.
नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्ती उद्भवल्यास स्थानिक पातळीवरील यंत्रणा आणि
स्थानिकांचे आपत्ती निवारण्यासाठी सहकार्य महत्त्वाचे ठरते. आजच्या विद्यार्थ्यांना
शालेय अभ्यासाबरोरबच आपत्ती विषयक माहिती मिळणे आवश्यक आहे. अत्यंत वेगाने होणारे
शहरीकरण आणि त्यामुळे येणारा यंत्रणेवरील ताण हा चिंतेचा विषय आहे. पण शाळेपासूनच
आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळणे आणि आपत्ती ओढवल्यानंतर घ्यावयाची काळजी याची
माहिती विद्यार्थ्यांना असणे ही काळाची गरज असणार आहे.
पारदर्शकता, पररस्परातील
उत्तरदायित्व, विश्वासार्हता, सार्वजनिक
आरोग्य लाभाला प्रोत्साहन, संवाद आणिा स्थिरता हे घटक
महत्वाचे आहेत. संवेदनक्षम गाव, संवेदनक्षम आजीविका, संवेदनक्षम मूलभूत सेवा, संवेदनक्षम महत्वपूर्ण
मूलभूत संरचना आणि संवेदनक्षम शहर निर्माण करणे याला प्राधान्य देणे गरजेचे
असल्याचे युनिसेफचे इर्मजन्सी प्रोग्रॉमींग हेड लार्स बर्न्ड यांनी सांगितले.
बिहार राज्याच्या आपत्ती
व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. यु. के. मिश्रा यावेळी म्हणाले, जवळजवळ वीस
वर्षांपूर्वी आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र विभाग बिहार राज्याने सुरु केला. आपत्ती
नंतर लोकांचे पुनर्वसन हे कर्तव्य नाही तर धर्म मानून काम केले आणि बिहार
राज्यासाठी पुढील 15 वर्षांचा रोडमॅप तयार केला.
दक्षिण एशियासाठी काम करणारे
डॉ. निलेश बुध्दा यावेळी म्हणाले, आपत्ती ओढवल्यानंतर पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
आपत्ती ओढवल्यानंतर पुरेशी आरोग्य व्यवस्था तयार करणे, औषध
साठा असणे, लसी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या चर्चासत्राला यूएनडीपी, युनिसेफ,
युनिस्केप, यूएनएसडीआर, जागतिक
आरोग्य संघटना (WHO) इत्यादी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित
होते.
००००
No comments:
Post a Comment