मुंबई, दि. 27 : नियंत्रक
शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या आधुनिकीकरण व अद्यावतीकरण केलेल्या मुंबई
कार्यालयाचे (विस्तारीत) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
संपन्न झाले. चर्चगेट स्थानकाजवळील एक्सप्रेस इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील या
कार्यालयाचे नुकतेच आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षणमंत्री
गिरीश बापट, उद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री
सुभाष देसाई, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र
चव्हाण, आमदार राज पुरोहित, अन्न व
नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, संचालक व
नियंत्रक शिधावाटप कैलास पगारे उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment