Saturday, 2 March 2019

दुग्ध व मत्स्यपालनाला प्रोत्साहन देऊन उत्पादन दुप्पट करणार - चंद्रशेखर बावनकुळे



·         मत्स्यपालन दोन कोटी रुपये खर्चाचा आराखडा
·         पशुसंवर्धन विकासासाठी अडीच कोटी
·         महिला बचत गटांना देणार प्रोत्साहन
·         सर्वांसाठी घरे योजनेंतर्गंत 15 जूनपर्यंत भूखंड पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण करा
 नागपूर दि. 2 : शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांचे दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी मत्स्य व्यवसाय,
 दुग्धविकास व पशूधन विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, या अंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी
 दोन कोटी रुपये तसेच पशूधन विकास आराखड्यांतर्गंत महिला बचत गटांना शेळीपालन व दुग्धव्यवसायासाठी 
अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 
     हैद्राबाद हाऊस येथे आयोजित विविध विषयावर पालकमंत्री आढावा घेत होते. त्यावेळी ते बोलत होते. 
 यावेळी खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सुधाकर कोहळे,  नागपूर महानगर
 विकास प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती शितल उगले, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण,
 उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, म्हाडाचे मुख्याधिकारी श्री. भिमनवार, 
जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
     ग्रामीण भागातील नागरिकांचे दरडोई उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष आराखडा तयार करण्यात
 आला असून, या अंतर्गंत राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा खनिज निधी 
अंतर्गंत निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पशूसंवर्धन विभागांतर्गंत तालुकास्तरावर महिला बचत गट तसेच 
दिव्यांग व्यक्तींसाठी पशूपालन व शेळीपालन सुरु करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध 
करुन देण्यात येणार आहे. नाविन्य उपक्रम म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे. मानव विकास  योजनेंतर्गंत 
कृषी यांत्रिकीकरणासाठी एक कोटी 79 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यंत्रणांनी विशेष अभियानांतर्गंत
 नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिल्या.  
    प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत ‘सर्वांसाठी घरेनागपूर महानगरपालकेसह जिल्ह्यातील सर्व नगर पालिका 
आणि नगर पंचायतीमध्ये शासकीय जागेवर  असलेल्या झोपडपट्टीधारकांना  मालकी हक्काचे पट्अे वाटपाचे काम 
येत्या 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. 
   सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल बांधताना मालकी हक्क पट्टे मिळालेल्या लाभार्थ्यांचा 
योजनेत समावेश करावा. ही योजना प्राधान्याने राबविण्याच्या दृष्टीने नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या 
मुख्याधिकाऱ्यांनी येत्या 15 जूनपूर्वी पूर्ण करावेत,अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. नागपूर सुधार प्रन्यास 
व म्हाडा यांनीही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत बांधावयाच्या घरांच्या नियोजनाबाबत नियोजित वेळेत कामे पूर्ण 
करावीत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.  
    यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्मकार समाजभवन बांधकाम, कामगारांना पी.एफ. मिळवून देणे,
गुमगाव मॉयल खदान येथे नव्याने सुरु होत असलेल्या फेरोअलॉय प्लॉट खरेदीसाठी होत असलेल्या विलंबाबाबत,  
मिहानमधील प्रलंबित निपटारा सदनिका वाटपाबाबत आदि विषयांवरही या बैठकीत आढावा घेण्यात आला. 

                                                                                    ****

1 comment:

  1. साहेब ग्रामीण भागातील शेती पंंप,व्यवसायिक कनेक्शन थांंबवली असल्यामुळे आपल्या खाते विषयी तिव्रनाराजी आहे कृृपया लक्ष द्या

    ReplyDelete