निवडणूक काळातील चांपा शिवारात झाला होता कार अपघात
नागपूर दि. 02 : लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतताना अपघातात मृत पावलेल्या दोन शिक्षकांच्या पत्नींना आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रत्येकी 15 लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.
यावेळी निवडणूक उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आणि उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी श्रीमती योगिता नुकेश मेंढुले यांना तर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी श्रीमती माधुरी पुंडलिक बाहे यांना भारतीय स्टेट बँकेच्या उमरेड शाखेत देय असलेले हे धनादेश वितरीत केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. पुंडलिक बापूराव बाहे (56), रा. राहाटे ले-आऊट हे स्व. दामोधर खापर्डे विद्यालय, साळवा, ता. कुही येथे आणि नुकेश नारायण मेंढुले (38) रा. भांडारकर ले-आऊट हे अशोक कन्या विद्यालय, उमरेड येथे कार्यरत होते. हे दोन्ही शिक्षक लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घरी जात असताना उमरेड- नागपूर मार्गावर चांपा शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला होता.
****
No comments:
Post a Comment