मुंबई, दि. १३ : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘विज्ञान क्षेत्रातील संधी’ या विषयावर करिअर
मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि. १४ मे रोजी संध्याकाळी ७. ३० वाजता प्रसारित
होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
करिअरच्या दृष्टीने विज्ञान शाखा ही एक महत्वाची शाखा मानली जाते. या
शाखेतील करिअरच्या संधी,
दहावी व बारावी नंतरचे विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम, विज्ञान शाखेच्या माध्यमातून संरक्षण, कृषी, संशोधन, हॉस्पीटॅलिटी, वास्तुविशारद
या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी, करिअरच्या
दृष्टीने आवश्यक असणारी कल चाचणी आदी विषयांची माहिती श्री. मापुस्कर यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
000
No comments:
Post a Comment