वृ.वि.1125 दि. 4 जून, 2019
मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'तंबाखूमुक्त महाराष्ट्र ' या विषयावर राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील सहायक प्राध्यापक डॉ. संगीता अंभोरे आणि सलाम मुंबई फाउंडेशनचे ग्रामीण प्रकल्प प्रमुख दिपक पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. 6, शुक्रवार दि. 7 आणि शनिवार दि.8 जून, रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी शासनाचे उपक्रम, व्यसनमुक्तीसाठी सलाम मुंबई फाउंडेशन करत असलेलं काम, तंबाखूजन्य पदार्थांचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यापासून सुटका होण्यासाठी करावे लागणारे उपाय आदी विषयाची सविस्तर माहिती श्री बडोले, पाटील आणि संगीता अंभोरे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment