कोल्हापूर दि.13
(जिमाका) :- पूरग्रस्तांसाठी जिल्हयात 210
संक्रमण शिबिर सुरु करून त्यामध्ये 73 हजार 489 लोकांची सोय करण्यात आली आहे.
यामध्ये एकटया शिरोळ तालुक्यातील 93 संक्रमण शिबिरामध्ये 40 हजारावर लोकांची सोय
करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील 210
संक्रमण शिबिरातील 73 हजार 489 लोकांची तालुकानिहाय माहिती अशी- शिरोळ तालुक्यातील
93 संक्रमण शिबिरामध्ये 40 हजार 40 लोकांची सोय करण्यात आली आहे. करवीर
ग्रामीणमध्ये 8 संक्रमण शिबिरामध्ये 786 लोकांची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर
शहर विभागात 28 संक्रमण शिबिरामध्ये 5 हजार 870 लोकांची सोय करण्यात आली आहे.
हातकणंगले तालुक्यातील 31 संक्रमण शिबिरामध्ये 8 हजार 813 लोकांची सोय करण्यात आली
आहे. इचलकरंजी शहरामध्ये 48 संक्रमण शिबिरामध्ये 17 हजार 575 लोकांची सोय करण्यात
आली आहे आणि चंदगड तालुक्यातील 2 संक्रमण शिबिरामध्ये 405 लोकांची सोय करण्यात आली
आहे. या संक्रमण शिबिरातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच पाणी, आरोग्य अशा
पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचेही
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment