* नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात 130 तर नरखेड 93 मि.मी. अतिवृष्टी
* गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात 75.30 मि.मी. पावसाची नोंद
नागपूर, दि. 7 : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 22.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात सर्वाधिक 130 मि.मी., नरखेड तालुक्यात 93 मि. मी. नोंद झाली. तसेच गडचिरोली सिरोंचा तालुक्यात 75.30 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.
गडचिरोली 34.73 (828.09), नागपूर 28.82 (557.73), चंद्रपूर 27.71 (658.79), वर्धा 24.07 (514.92) गोंदिया 10.26 (515.09) तर सर्वात कमी पाऊस भंडारा जिल्ह्यात 7.00 (560.23) पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
नागपूर विभागात दिनांक 1 जून 2019 ते 7 ऑगस्ट 2019 पर्यत सरासरी 605.81 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
*****
No comments:
Post a Comment