मुंबई, दि. 5
: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा
नुकताच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान येथे पार पडला. या
कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहे तसेच आकाशवाणीच्या 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रसारित करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट
पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल
मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी तसेच
अग्रलेखनासाठी सन-2016,सन-2017 आणि सन-2018, महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघु चित्रपट स्पर्धा
सन -2016, महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा
सन-2017 व 2018 या वर्षासाठीचे पुरस्कार, विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता
सन्मान योजनेची सुरुवातही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. या
कार्यक्रमाचे निवेदन शिल्पा नातू यांनी
केले आहे.
या
कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत 'जय महाराष्ट्र' हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 6 ऑगस्ट
2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत दाखविण्यात येणार आहे. तसेच 'दिलखुलास'
हा कार्यक्रम राज्यातील
आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर बुधवार दि.7
व गुरूवार दि.8 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, संचालक अजय अंबेकर व संचालक सुरेश वांदिले, जीवनगौरव पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार रमेश
पतंगे, आणि पंढरीनाथ सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
००००
No comments:
Post a Comment