मुंबई, दि. ०५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात' ''सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी" या विषयावर अभिवाचन प्रसारीत होणार आहे. हे अभिवाचन राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके आणि शिल्पा नातू यांनी हे अभिवाचन केलं आहे.
'आरोग्यम् धनसंपदा' म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. म्हणूनच राज्य शासनानेसुद्धा नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांना वैद्यकीय सोयीसुविधा सुलभतेने मिळाव्यात यासाठी गेली सुमारे पाच वर्ष ठळकपणे लक्ष दिले आहे. त्याचाच परिणाम सर्वंकष आरोग्य निर्देशांकात दिसून आला असून निर्देशांकात राज्य संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्या अनुषंगाने हे अभिवाचन प्रसारित होणार आहे.
००००
No comments:
Post a Comment