मुंबई, दि. 24 : शासकीय
रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दि. 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर
2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते.
त्यानुसार मोहोरबंद प्रश्नपत्रिका वितरणाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु काही
तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.
परीक्षेचे पुढील वेळापत्रक www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ज्या
परीक्षा केंद्रांने प्रश्नपत्रिकांची मोहोरबंद पाकीटे ताब्यात घेतली आहेत. ती सर्व
मोहोरबंद पाकीटे प्रश्नपत्रिका वितरण केंद्रावर परत करावी, याची शासकीय रेखाकला
परीक्षा 2019चे सर्व विद्यार्थी, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी
नोंद घ्यावी, असे आवाहन कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे परीक्षा
नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment