Tuesday, 24 September 2019

निवडणूक प्रक्रियेदरम्यान शस्त्रबंदी


नागपूर, दि.24 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 निर्भय, शांततामय, न्याय वातावरणात व सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये, मानवी जिवीत हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत आदेश पारीत केलेला असून नागपूर ग्रामीण जिल्हयात दिनांक 21 सप्टेंबर 2019 पासून ते 27 ऑक्टोबर 2019 पर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. परंतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील शस्त्रांचा गैरवापर होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे.
तसेच छाननी समितीच्या दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजीच्या सभेत ज्या परवानाधारक व्यक्तींना निवडणूक कालावधीत स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची, वाहून नेण्याची अत्यंत आवश्यकता असेल अशाच व्यक्तींनी आदेश निर्गमित झाल्यापासून दहा दिवसांचे आत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर यांचे समक्ष विनंती अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, नागपूर यांनी कळविले आहे.
*******

No comments:

Post a Comment