Saturday, 19 October 2019

नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील 13 मतदान केंद्रांमध्ये बदल



नागपूरदि. 19 : नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील 13 मतदान केंद्रात बदल झाला असून  ते इतर इमारतींमध्ये स्थानांतरित करण्यात आल्याची  माहीती नागपूर उत्तर (अ.जा.)च्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डॉ. सुजाता गंधे  यांनी दिली आहे. 
नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्रातील बदल खालीलप्रमाणे दर्शविला आहे.
1) मतदान केंद्र क्रमांक 25महात्मा फुले प्राथमिक शाळा, बँक कॉलोनी नारी रोड, खोली क्र. 1 हे मतदान केंद्र कामगार नगर ब्लॉसम पब्लिक स्कूल, कामगार नगर, नागपूर खोली क्रं.1 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
2) मतदान केंद्र क्रमांक 26 महात्मा फुले प्राथमिक शाळा, बँक कॉलोनी नारी रोड, खोली क्र.2 हे  मतदान केंद्र आता कामगार नगर ब्लॉसम पब्लिक स्कूल, कामगार नगर, नागपूर खोली क्रं.2 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
 3) मतदान केंद्र क्रमांक 154, नागसेवन मराठी प्राथमिक शाळा, विनोबा भावे नगर खोली क्रं.1 हे मतदान केंद्र  ईरा इंटरनॅशनल स्कुल, वांजरा नागपूर खोली क्रं. 1 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
4) मतदान केंद्र क्रमांक 202 एस.के.बी. प्राथमिक विद्या मंदिर यादव नगर नागपूर खोली क्रं.3 हे मतदान केंद्र आता  बहुजन हिताय सभागृह यादव नगर नागपूर खोली क्रं. 2 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
5) मतदान केंद्र क्रमांक 212 व 213 म.न.पा. कळमना वस्ती प्राथमिक शाळा नागपूर खोली क्रं.3 व खोली क्रं.4 हे  मतदान केंद्र अनुक्रमे युनिटी इंग्लीश उच्च प्रा. शाळा नाका नं. 4 कळमना, नागपूर खोली क्रं. 1 खोली क्रं.2 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
6) मतदान केंद्र क्रमांक 226 विशाखा प्राथमिक शाळा कांजी हाऊस चौक बिनाकी मंगळवारी नागपूर खोली क्रं. 1 हे मतदार केंद्र आता राधाबाई उच्च प्रा. शाळा कांजी हाऊस चौक नागपूर खोली क्रं. 1 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
7) मतदान केंद्र क्रमांक 227 किदवाई प्राथमिक शाळा आसी नगर नागपूर खोली क्रं.3 हे मतदान केंद्र आता  राधाबाई उच्च प्रा. शाळा कांजी हाऊस चौक नागपूर खोली क्रं. 3 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
8) मतदान केंद्र क्रमांक 228 किदवाई प्राथमिक शाळा आसी नगर नागपूर खोली क्रं.3 हे मतदान केंद्र आता राधाबाई उच्च प्रा. शाळा कांजी हाऊस चौक नागपूर खोली क्रं. 3 येथे स्तानांतरित करण्यात आले आहे.
9) मतदान केंद्र क्रमांक 236 व 237 उल्हास गायकवाड उच्च प्राथमिक विद्यालय महेंद्र नगर नागपूर खोली क्रं.1 व 2 हे आता नागार्जुन वाचनालय (आचार्य शांतीदेव वाचनालय), महेंद्र नगर, नागपूर  अनुक्रमे खोली क्रं. 1 व 2 येथे स्तानांतरित करण्यात आले आहे.
10) मतदान केंद्र क्रमांक 343 सिध्दार्थ विद्यालय नवि मंगळवारी, नागपूर खोली क्रं.4 हे मतदान केंद्र आता (सिध्दार्थ प्रा. शाळा नवीन मंगळवारी, नागपूर खोली क्रं. 1 येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
11) मतदान केंद्र क्रमांक 344 सिध्दार्थ विद्यालय नवी मंगळवारी, नागपूर खोली क्रं.5 हे मतदान केंद्र आता सिध्दार्थ विद्यालय नवी मंगळवारी, नागपूर खोली क्रं. 2 येथे  स्थानांतरित  करण्यात आले आहे.
तरी उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी या नोंद घ्यावी, असे
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डॉ. सुजाता गंधे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
*******

No comments:

Post a Comment