Friday, 18 October 2019

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिनांक 14 डिसेंबर 2019 रोजी


नागपूर,दि.18 : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या वतीने दिनांक 14 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. साधता संवाद, मिटतो वाद “आपसी समझोत्याने व सामंजस्याने वाद मिटवावे” या विषयावर या अदालतीमध्ये नागरिकांच्या समस्या व वाद मिटवण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरिता या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव  धनराज काळे यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment