नागपूर, दि. 19 : लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या निमित्त असलेल्या शासकीय सुट्टया तसेच शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2019 रोजी चौथा शनिवार असल्यामुळे दिनांक 26 ते 29 ऑक्टोबर 2019 या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर(शहर) येथून विशेष परवाने जारी केले जाणार नाहीत. परंतु विशेष परवाने मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. याची नोंद सर्व संबंधित वाहन धारक, परवानाधारकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment