नागपूर दि.26 : शालेय शिक्षण क्रीडा विभागातील जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सुधारित शासन निर्णयानुसार सन 2019-20 या
वर्षासाठी गुणवंत क्रीडापटू, मार्गदर्शक व क्रीडा संघटकांकडून जिल्हा क्रीडा
पुरस्कारासाठी
अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड
यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील
उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्या कामाचे आणि
योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा या उद्देशने महाराष्ट्राच्या क्रीडा
धोरणांतर्गत हा पुरस्कार देण्याची योजना
कार्यान्वयीत आहे. त्यानुसार गुणवंत खेळाडू महिला व पुरुष असे दोन पुरस्कार तसेच
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा संघटक असे प्रत्येकी एक पुरस्कार असे एकूण
चार देण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रुपये 10 हजार रोख असे
पुरस्काराचे स्वरुप असेल.
अर्जदार सलग 15
वर्षे महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. या पुरस्काराचा कालावधी 1 जुलै ते 30 जून मधील
ग्राह्य धरला जाईल. सदर पुरस्काराकरिता क्रीडा क्षेत्रातील पात्र अर्जदारांनी
विहित नमुन्यातील अर्ज 5 डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय
संकुल, मानकापूर कोराडी रोड येथे सादर करावा.
अधिक माहिती आणि
अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर
201209261427360500 या क्रमांकावर उपलब्ध आहे. तरी जास्तीत-जास्त क्रीडा
क्षेत्रातील गुणवंत मार्गदर्शक क्रीडा कार्यकर्ता आणि खेळाडू यांनी अर्ज सादर
करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment