नागपूर, दि. 23 : जिल्ह्यातील खळबंदा येथील कु.आंचल कैलाश कांबळे या मुलीवर ॲसीड हल्ला करण्यात आल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे तिच्या पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून 1 लाख रुपये तातडीने विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले.
सदर सहाय्यता निधीचा धनादेश कु.आंचल कांबळे हिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी नागपूर कक्षाचे प्रमुख व सदस्य सचिव डॉ. के. आर. सोनपुरे यांचे हस्ते 21 डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील वार्ड क्र.4 मध्ये उपचारा दरम्यान प्रदान करण्यात आले. सहाय्यता निधीचा धनादेश देतेवेळी नागपूर शहर तहसिलदार श्री. वासनिक, डॉ. मुरारी सिंग, वरिष्ठ सहाय्यक जॉन अनभोरे, व आंचल कांबळे हिचे भाऊ उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment