Friday, 20 December 2019

लोकशाही दिनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पालक सचिवांची नेमणूक

नागपूरदि. 20 : राज्यातील जिल्हा पालक सचिव पदावरील नियुक्त्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याकरिता शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आणि अमरावती जिल्ह्याकरिता ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भातील शासन परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक 201912041241102007 असा आहे.
००००

No comments:

Post a Comment