नागपूर, दि.23 : राज्य शासनाने माहे जुलै व ऑगस्ट, 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या पीकासाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीककर्ज माफ करण्याचा निर्णय 23 व 27 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. शेतकऱ्यांकडील बाधित पिकांचा पंचनामा जिल्हा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आला असून शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे तयार करण्यात आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित तहसिल कार्यालयाकडून संबंधित सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. या याद्या जिल्हयातील सर्व बँक शाखा विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी दिली आहे.
*******
No comments:
Post a Comment