Thursday, 2 January 2020

डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख


            मुंबई, दि. 2 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. श्री डी.पी. त्रिपाठी उच्च विद्याविभूषित आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्व होते. श्री. त्रिपाठी यांचेशी माझा घनिष्ठ परिचय होता. नेपाळमध्ये देखील ते लोकप्रिय होते. सर्वच पक्षात मित्र असलेल्या त्रिपाठी यांच्या निधनामुळे आपण लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या उत्तम संसदपटूला गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.      
००००

No comments:

Post a Comment