आगामी
आर्थिक वर्षासाठी 57 कोटी 66 लाखांची वाढ
- अर्थमंत्री
अजित पवार
नागपूर, दि.
28: नागपूर जिल्ह्यासाठी
2020-2021 या आर्थिक वर्षात 299 कोटी 52 लाख रुपयांच्या नियोजन आराखड्यास
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंजुरी दिली. शासनाने 241 कोटी
86 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करून
दिली होती.
अर्थमंत्र्यांनी
आजच्या बैठकीत 57 कोटी 66 लाख रुपये अतिरिक्त वाढ मंजूर केली. शेतक-यांसाठी
कर्जमुक्ती योजनेला प्राधान्य देणार असल्याचे श्री. पवार म्हणाले. विभागीय आयुक्त
कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या
बैठकीला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री
सुनिल केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, आमदार
प्रकाश गजभिये, समीर मेघे, विकास ठाकरे यांच्यासह वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव
देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा
नियोजन अधिकारी मिलींद नारींगे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कायदा व सुरक्षिततेच्या
दृष्टीने 25 वाहनांसाठी साडेतीन कोटी निधीची आवश्यकता असल्याचे गृहमंत्री श्री. देशमुख
यांनी सांगितले. तर अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद
करण्याचे अर्थमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
नागपूर हे
उपराजधानीचे शहर आहे. त्यामुळे येथील विकासकामे बाधीत होणार नाही. अतिरिक्त
निधीच्या बाबतीत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या सहमतीने योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही अर्थमंत्री श्री. पवार
यांनी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment