मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'प्रधानमंत्री मातृ वंदना
योजना' या विषयावर
आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत
राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शुक्रवार दि. 3
जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या
वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, या योजनेची सुरूवात, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, जननी सुरक्षा योजना,
माता आरोग्याकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माहितीसाठी विभागाने राबविलेले उपक्रम या विषयाची माहिती
डॉ.पाटील यांनी 'दिलखुलास' या
कार्यक्रमात दिली आहे.
000
No comments:
Post a Comment