नागपूर, दि. 17 : भारत
निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार
यादीचा विशेष कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार मतदार यादी निर्दोष होण्यासाठी
मतदार याद्यांचे पुनरिक्षण प्रत्यक्षात सुरु करण्यापूर्वी 29 फेब्रुवारी 2020 (शनिवार) पर्यंत मतदार
पडताळणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर मतदारांनी
आपल्या नावाची व मजकुराची पडताळणी
करुन चुका दुरुस्त करुन घेण्याचे आवाहन
जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
मतदारांकडून स्वयंस्फूर्तीने www.nvsp.in या
पोर्टलवरुन माहिती आणि मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे प्राप्त झालेले नमुने तसेच Online
BLO Apps वरुन अपलोड
केलेल्या मतदाराच्या तपशीलाची पडताळणी व
प्रमाणीकरण करण्यात येवून ती दुरुस्ती मतदार यादीत करण्यात येणार आहे.
मतदार पुनरिक्षण कार्यक्रम :
मतदार पडताळणी कार्यक्रम 29
फेब्रुवारी 2020 पर्यंत सुरु. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे 13 मार्च
2020 (शुक्रवार), दावे व हरकती स्वीकारण्याचा
कालावधी - 13 मार्च 2020 (शुक्रवार) ते 15 एप्रिल 2020(बुधवार), विशेष
मोहिमांचा कालावधी 28 मार्च,2020 (शनिवार) आणि 29 मार्च 2020 (रविवार) तसेच 11 व 12 एप्रिल 2020 (अनुक्रमे शनिवार व रविवार), दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक 30 एप्रिल 2020(गुरुवार) पूर्वी,
प्रारुप मतदार यादीच्या मापदंडांची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम
प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे - 6
मे 2020(बुधवार) पूर्वी, डेटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे- 11
मे 2020 (सोमवार)पूर्वी, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी - 15 मे 2020 (शुक्रवार).
व्होटर हेल्पालाईन, मोबाईल
ॲप, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NSVP), सामायिक
सेवा (CSCs) केद्र, मतदार नेंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी
संलग्न मतदार सुविधा केंद्र तर दिव्यांग असलेले मतदार व्होटर हेल्पलाईन 1950 शी
संपर्क करुन मतदार आपल्या तपशीलाची
पडताळणी करु शकतील.
मतदारांनी या सुविधांच्या आधारे आपल्या तपशीलाची तसेच त्यात
छायाचित्र व नोंदीबाबत दुरुस्ती असल्यास त्याची पडताळणी करुन मतदार यादी अद्ययावत
करण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment