लाभार्थ्यांना धान्य किटचे वाटप
नागपूर, दि. 13 : कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू वितरणाचा रामटेक
उपविभागाचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज आढावा घेतला. उपविभागीय कार्यालयात
झालेल्या या आढावा बैठकीस पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार
कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी
राज्यमंत्री राजेंद्र मुळक, अप्पर
जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपविभागीय
अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार वरुन
शहारे उपस्थित होते. गरजू व गरीब व्यकींना शासनाच्या नियमानुसार तात्काळ अन्न
धान्य वाटप करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. रेशन कार्ड नसणाऱ्या
नागरिकांची यादी बनविण्यात यावी असे सांगून यासाठी रेशन
दुकानात तक्रार पेटी ठेवण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले.
रामटेक उपविभागात रामटेक व पारशिवणी तालुक्यांचा समावेश असून
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याची माहिती श्री. कट्यारे यांनी दिली. उपविभागात 7 निवारागृहे
तयार केली असून आतापर्यंत 266 व्यक्तींना
त्याचा लाभ देण्यात आला आहे. या क्षेत्रात विटभट्टी मजुरांची संख्या मोठ्या
प्रमाणात आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर मजुरांनी स्थलांतर न करता आहे तिथेच
राहण्याचा निर्णय घेतला. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा
पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रामटेक येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ व पारशिवणी येथील नवोदय विद्यालयात अतिरिक्त व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. धान्य वाटप करताना त्याचा लाभ अपात्र लाभार्थ्यांना होणार नाही तसेच योग्य लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे आमदार आशिष जयस्वाल यांनी सुचविले. एप्रिल महिन्याचे धान्य वाटप याच महिन्यात करण्याची त्यांनी मागणी केली. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा आहार तसेच शालेय पोषण आहाराचे वाटप तात्काळ पूर्ण करण्यात यावे असे जयस्वाल यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment