चिमुकल्या सांज सोमकुंवरची वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
नागपूर, दि. 25 : वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे पदार्थ, मित्र-मैत्रिणी
पाहणे यांची चंगळ. मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिचा 25 एप्रिल 2020 ला 10 वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या
दिवशी चिमुकल्या सांजने मोठ्यानांही लाजवेल, असा निर्णय घेवून आपला वाढदिवस अत्यंत
साधेपणाने साजरा करून त्यासाठीची
रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कोवीड 19 करीता दहा हजार
रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.
No comments:
Post a Comment