नागपूर, दि.9 : पशुवैद्यकीय
महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन आज पशुसंवर्धन मंत्री सुनिल
केदार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉ. विकास महात्मे, महाराष्ट्र पशु
विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, कुलसचिव चंद्रभान पराते,
अधिष्ठाता डॉ. ए.पी. सोमकुंवर, संशोधन संचालक एन.बी. कुरकुरे, विद्यापीठ
प्रयोगशाळेचे एस.पी. चौधरी, नियंत्रक दामोदर राऊत, परीक्षा निरीक्षक एन.पी. बोंडे यावेळी
उपस्थित होते.
पशुवैद्यकीय
महाविद्यालयातील या प्रयोगशाळेत पशुंपासून मानवांना होणाऱ्या विविध आजारांचे निदान
केले जाते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) मान्यता दिलेले सेंटर फॉर झोनोसिस
कार्यरत आहेत. या सेंटरमध्ये लेप्टोपॉरोसिस, टी.बी., स्क्रॅब टॉयफस व क्यू फिवर या
महत्वाच्या आजारांचे संशोधन व निदान केले जाते. ही प्रयोगशाळा अद्यावत
तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यात उच्च तंत्रज्ञानाचा रोगनिदानासाठी वापर केला
जातो. सहा प्राध्यापकांचे पथक येथे कार्यरत आहे. रिअल टाईम पीसीआर चाचणीद्वारे
कोविड नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.
कोरोना संशयितांचे
नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसु) नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या
प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक
जाणिवेतून विद्यापीठाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. येथील प्रयोगशाळेत आता चाचण्या
करण्यात येतील.
डॉ. संदीप चौधरी डॉ. वकार खान, डॉ. प्रभाकर टेभुणे, डॉ. शिल्पा शिंदे व डॉ. अर्चना पाटील यांनी
चाचण्या करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेले आहे. सोबतच शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील कर्मचारीही या कामात मदत करणार आहेत.
******
No comments:
Post a Comment