नागपूर, दि. 5
: महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा
इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2019-20
मध्ये घेण्यात आलेल्या
कलमापन व अभिक्षमता चाचणी मोबाईल आणि संगणकाद्वारे घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल दिनांक 1 मे 2020 पासून मंडळाच्या www.mahacareermitra.in
या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
इयत्ता 10 वीच्या
विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी कृषी, कला व मानव्यविद्या,
वाणिज्य, ललित कला, आरोग्य
व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रातील
विद्यार्थ्यांचे कल जाणून घेण्यासाठी घेण्यात आली. विद्यार्थी त्याच्या एस. एस. सी. बोर्ड बैठक क्रमांकाच्या
आधारे त्याचा कल, अभिक्षमता चाचणी अहवाल प्राप्त करु शकतात. त्यासाठी www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुख्य पृष्ठावर त्यांनी आपला बैठक क्रमांक
नमूद केल्यानंतर त्यांना त्यांचा अहवाल मिळू शकेल.
विद्यार्थ्यांना
त्यांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे जाणून घ्यायला, कलचाचणी व्हिडिओवर पाहू शकतात.
त्याच बरोबर त्यांचा कल असलेल्या कलक्षेत्रात पुढील शिक्षणासाठी त्यांच्या क्षमता
पुरेशा आहेत काय याबाबत
आपली अभिक्षमता विद्यार्थी जाणून घेवू शकतात.
कल अभिक्षमता चाचणी सत्र 2020 मध्ये राज्यातील
22,478 शाळांमधून इयत्ता 10 वीच्या 15,76,926 विद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी
मोबाईल आणि कॉम्प्यूटरच्या माध्यमातून घेण्यात आली होती. 19.3 टक्के
विद्यार्थ्यांनी 7 कल क्षेत्रांपैकी ‘गणवेशधारी सेवा’ आणि 17.7 टक्के ‘ललितकला’ या
क्षेत्रांना पहिले प्राधान्य दिले. 20 टक्के मुलांचा पहिला प्राधान्य कल ‘गणवेशधारी
सेवा’ क्षेत्रात आणि 19.8 टक्के मुलींचा पहिला प्राधान्य कल ललितकला या क्षेत्रामध्ये आहे. 16.8 टक्के
विद्यार्थ्यांचे ‘वाणिज्य’ हे कल क्षेत्र दुसरे प्राधान्य आहे. 16.1 टक्के मुलींचे
‘तांत्रिक’ आणि 16 टक्के ‘वाणिज्य’ ही दुसरी प्राधान्य असलेली कल क्षेत्रे आहेत.
महाराष्ट्रामधील 9 विभागांपैकी
6 विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि 2 विभागांमध्ये ललितकला या क्षेत्रांना पहिले
प्राधान्य असून 9 पैकी 8 विभागांमध्ये ‘वाणिज्य’ या कला क्षेत्राला दुसऱ्या क्रमांकाचे
प्राधान्य असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव रविकांत
देशपांडे यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment