नागपूर, दि. 12 : कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील 89 हजार 924 शेतकऱ्यांपासून 18 लाख 64 हजार 189 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवून जिल्ह्यात कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे असलेला कापूस खरेदी करण्यासाठी सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे सुरु राहणार आहेत.
कापूस खरेदी योजनेंतर्गत दहा तालुक्यात कापूस पणन महासंघ व सी. सी. आय. मार्फत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे. कापूस पणन महासंघातर्फे नोंदणी केलेल्या 16 हजार 860 शेतकऱ्यांकडून 4 लाख 8 हजार 455 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सी. सी. आय. मार्फत 3 हजार 705 शेतकऱ्यांकडून 1 लाख 24 हजार 904 क्विंटल तसेच खाजगी बाजाराच्या माध्यमातून 5 हजार 293 शेतकऱ्यांकडून 81 हजार 896 क्विंटल, थेट परवानाधारक 2 हजार 20 शेतकऱ्यांपासून 42 हजार 740 क्विंटल तसेच खाजगी समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी 61 हजार 399 शेतकऱ्यांकडून 12 लाख 6 हजार 191 कापसाची खरेदी केली आहे.
नोंदणी केलेल्या 30 हजार 286 शेतकऱ्यांकडील 18 हजार 261 कापूस अद्याप खरेदी शिल्लक आहे. कोविड-19च्या आधी 57 हजार 705 शेतकऱ्यांडून 12 लाख 18 हजार 346 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. कोविड-19 नंतर 32 हजार 219 शेतकऱ्यांसाठी 6 लाख 45 हजार 843 क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
*****
No comments:
Post a Comment