नागपूर, दि.18: पशुसंवर्धन मंत्री
सुनिल केदार यांनी आज तेलंगखेडी येथील वळू संगोपन केंद्राला भेट
दिली. यावेळी पशुसंवर्धन सहआयुक्त के.एस.कुमरे, केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संजय ठाकरे उपस्थित
होते. या केंद्राच्या प्रक्षेत्राच्या सभोवताली असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम
पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर अमरावती रोडवरील अतिशीत रेत केंद्रालाही
त्यांनी भेट दिली. यावेळी सरव्यस्थापक डॉ. रमेश भैसारे यांनी केंद्राच्या कार्याची
माहिती दिली. अतिशीत केंद्रातील कृत्रीम रेतन केंद्रात असलेल्या प्रयोगशाळेचीही
त्यांनी पाहणी केली. गीर, साहीवाल, जर्सी
या जातीच्या वळुची पाहणी केली. रेत मात्रा उत्पादन 20 लाख युनिट करण्याचे निर्देश श्री. केदार यांनी दिलेत.
*****
No comments:
Post a Comment