नागपूर, दि. 18 : आदिवासी गोवारी समाज संघटनेतर्फे चालविण्यात येणाऱ्या भंडारा येथील विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळेतील गैरव्यवहाराबाबत तात्काळ चौकशी करून धर्मदाय आयुक्तांनी तेथे प्रशासक नियुक्त करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.
येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळेच्या गैरव्यवहाराबाबत श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. धर्मदाय सहआयुक्त आभा कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, धर्मदाय सहायक माणिक सातव, भंडारा समाज कल्याण सहायक आयुक्त आशा कवाडे, गोंदिया सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, तक्रारदार वा.ल. नेवारे तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळेच्या कार्यकारी समितीबाबत धर्मदाय आयुक्तांनी खरी कार्यकारिणी कोणती आहे, याबाबत खात्री करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. या संस्थेचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे लवकर निपटारा केल्यास त्या संस्थेचे वैधानिक कार्यकारी मंडळ कोणते, हे निश्चित होईल. तसेच सामाजिक न्याय विभागाने श्री. नेवारे यांच्या तक्रारीची खातरजमा करावी. दोषी आढळल्यास नवीन प्रशासक बसवावा, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.
*****
No comments:
Post a Comment