Tuesday, 21 July 2020

‘हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमास 6 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ’


                                                                                                     दिनांक: 21 जुलै 2020
                                                   
नागपूर, दि. 21: भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली असून 6 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
            महाराष्ट्रातून बरगढ (ओडीशा) येथील 13 व वेंकटगिरी येथील 2 जागेच्या प्रवेशासाठी  पात्र उमेदवारांनी नागपूर येथे वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांमार्फत विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना  व इतर अनुषंगिक माहिती  वस्त्रोद्योग आयुक्तालयाची  वेबसाईट  http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना वस्त्रोद्योग, प्रादेशिक उपआयुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
हामाग तंत्रविज्ञान पदविकेसाठी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती  प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रमांक- 2, 8 वा माळा, बी विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001, दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 यांच्या कडून प्राप्त करून घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना, विहित पात्रता व माहिती  कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली ‍आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  प्रादेशिक उपआयुक्त स. ल. भोसले यांनी केले आहे. 
****** 

    


No comments:

Post a Comment