Friday, 24 July 2020

कौशल्य विकास विभागाचे नोंदणीकृत सेवा सोसायट्यांना आवाहन



         नागपूर, दि. 24: कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या बेरोजगार युवकांच्या सेवा सोसायट्यांना 3 लाखापर्यंतची कामे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत-जास्त सेवा सोसायट्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त प्र. ग. हरडे यांनी केले आहे. 
            सर्व नोंदणीकृत सेवा सोसायट्यांना शासनाच्या विविध विभागातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील संगणक दुरुस्ती, वीज जोडणी, पार्कींग व्यवस्था, साफसफाई आदी कामे मिळवून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध कार्यालयातील अडचणीही दूर होतील. तरी या सोसायट्यांनी अधिक माहितीसाठी asstdiremp.nagpur@ese.maharashtra.gov.in या ई-मेल किंवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.
******







No comments:

Post a Comment