Tuesday, 4 August 2020

नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल जाहीर


नागपूर केंद्रावरुन सहा परीक्षार्थी गुणवत्ता यादीत

        नागपूर,  दि. 4:  नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला असून नागपूर येथील  भारतीय प्रशासकीय सेवा  पूर्व प्रशिक्षण केंद्रातील सहा परीक्षार्थ्यांनी  यात यश संपादन केले असून ते गुणवत्ता यादीत आले आहेत.

            निखिल सुधाकर दुबे, सुमीत सुधाकर रामटेके, प्रसाद सीताराम शिंदे, प्रज्ञा कैलास खंदारे, आशित नामदेव कांबळे,  स्वरुप रविंद्र दीक्षित या सहा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यात देशातून प्रसाद शिंदे यांना- 287, आशित कांबळे- 651 प्रज्ञा खंदारे - 719, निखिल दुबे - 733, सुमीत रामटेके- 748 तर स्वरुप दीक्षित यांना  827 वा रँक प्राप्त झाला आहे.

            या सर्व परीक्षार्थ्यांनी नागपूर केंद्रावरुन प्रशिक्षण घेतले असून त्यांनी नागपूर शहराचा मान वाढविला आहे, त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे, असे प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी सांगितले.

****  

No comments:

Post a Comment