दहेगाव ते कामठी रस्ता 11 सप्टेंबरपर्यंत बंद
नागपूर, दि. 7 : दहेगाव ते कुही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 246 चे बांधकाम पुर्णत्वास आले आहे. या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या कोलार नदीवरील पुलाची भार वाहण्याची क्षमता चाचणी करण्यात येत असून त्याकरिता दहेगाव ते कामठी रस्त्याचा भाग उद्या मंगळवार दि. 8 पासून 11 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. दहेगाव ते कामठी राष्ट्रीय महामार्ग 247 रस्त्यावरील वाहतूक सुरादेवी, कोराडी मंदीर, राष्ट्रीय महामार्ग 47, दहेगाव (रंगारी) ते खापरखेडा या मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता न.व.बोरकर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment