नागपूर, दि. 24: जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार, दिनांक 29
ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12 ते 2 या
कालावधीत स्किल इंडिया पोर्टलवर TP/TC ची नोंदणी कशी करावी, या
विषयावर ऑनलाईन समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कला, वाणिज्य,
विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, दुग्ध व्यवस्थापन, मत्स व
पशुसंवर्धन व्यवस्थापन, वैद्यकीय व नर्सिंग,
कृषी, औषध निर्माण, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवसाय प्रशिक्षण
केंद्र, शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्यागिक संघटनेच्या
आस्थापनांनी वेबिनारमध्ये सहभाग नोंदवावा,
असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त, प्र.
गं. हरडे यांनी केले आहे.
स्किल इंडिया
पोर्टलवर TP/TC बाबत मार्गदर्शन कॉलेज ऑफ इंटरनॅशनल
मॅनेजमेंटचे केंद्र प्रमुख अखिल अग्रवाल,
विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे केंद्र प्रमुख विजय बालपांडे, श्री. शिव शक्ती
एज्युकेशन सोसायटीचे केंद्र प्रमुख गौतम
बेताल करणार आहेत.
ऑनलाईन
बेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल मिट लिंक https/meet.google.com/kxc-auux-zkj यावर क्लिक करावे. गुगल मिट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आक्स
टू जॉईनवर क्लिक करुन वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन
करावे, अशी सूचना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदामार्फत
देण्यात आली आहे.
*****
No comments:
Post a Comment