नागपूर
दि .29 : नागपूर विभाग पदवीधार मतदार संघाच्या द्विवार्षिक
निवडणुकीकरीता 1 डिसेंबर रोजी मतदान होणार
असून मतदानाचा हक्क बजावण्यात दिव्यांग मतदारांना काही अडचण असल्यास
त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
0712-2700900 व 7262801201 या दोन क्रमांकावर दिव्यांगाना काही अडचण
असल्यास ते संपर्क करु शकतात.
काल
जिल्हयात 218 दिव्यांग व 80 वर्षावरील मतदारांना
त्यांच्या घरपोच मतपत्रिका निवडणूक पथकांमार्फत देण्यात आल्या. त्यामुळे 154 दिव्यांग व जेष्ठ मतदारांनी घरूनच
मतदानाचा हक्क बजावला होता. रविवारी पुन्हा निवडणूक पथके उर्वरीत घरी मतदान
प्रक्रिया पूर्ण करीत आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक
निर्णय अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी
दिली.
*******
No comments:
Post a Comment