Friday, 6 November 2020

 अनाथ मुलांना प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष पंधरवडा

नागपूर, दि.6 : बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय व स्वयंसेवी बालगृह, अनाथाश्रमात वाढलेल्या मुलांना बाहेर पडलेल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक व इतर सवलती मिळणे आवश्यक आहेत. त्यासाठी अशा मुलांना प्रमाणपत्र वाटपासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने विभागस्तरावर 14 नोव्हेंबरपासून विशेष पंधरवाडाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी दिली आहे.

            पंधरवाडा मोहीम राबविण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,बाल कल्याण समिती, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत असलेल्या संस्थोचे अधीक्षक, इतर सर्व संबंधितांना माहीत होण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा  महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक 2 सहावा मजला नागपूर येथे संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            त्यानुसार आई –वडीलांचा शोध घेऊन त्यापैकी कोणीच हयात नसल्याची खात्री यंत्रणेस असावी. व त्याबाबतचे संस्थेचे अधीक्षक यांचे प्रमाणपत्र महिला व बालविकास अधिका-यांनी प्रमाणीत करावे. त्यानंतर बालकल्याण समितीने आई-वडील हयात नसल्याचे व लाभार्थी अनाथ असल्याचे चौकशीअंती प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी बालकल्याण समितीने जन्म –मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम रजिस्टरचा दाखला ग्राह्य धरावा. वरील निकष पूर्ण करणारे मुल ज्या संस्थेत आहे, त्या संस्थेच्या अधीक्षकांनी अनाथ प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा.  या सर्व प्रस्तावांची छाननी करुन स्वयंस्पष्‍ट शिफारशीसह प्रस्ताव संबंधित उपायुक्तांकडून महिला बालविकास विभागाकडे पाठवावा व विभागाने अनाथ प्रमाणपत्र स्वाक्षरी करुन वितरीत करण्याची कार्यवाही करावी, असे महिला व बालविकास आयुक्त विभागाने कळविले आहे.

 

                                                            *****

No comments:

Post a Comment