Monday, 7 December 2020

 ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबर पासून

सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे एकमत

 

·         मनपा क्षेत्रात डिसेंबरच्या शेवटी घेणार निर्णय

·          

        नागपूर, दि. 7: कोरोना संसर्गामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊतविभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमारजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत सूतोवाच केले असून 14 डिसेंबर पासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्यशिक्षणसार्वजनिक स्वच्छतापोलीस यंत्रणेतील सर्व वरिष्ठ उपस्थित होते. यावेळी शाळा सुरू करण्याबाबतचा प्रश्न पुढे आला. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोना संदर्भातील चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिक्षकांनी अतिशय सकारात्मकपणे शाळा सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले. कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नयेअशी सार्वत्रिक भावना असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम,अटी पाळून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळांमध्ये शिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

            ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागात पालकांकडून शाळा सुरू करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी पुढे येत असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले. शहरी भागातील शाळा देखील लवकर सुरू करण्याबाबत पालकांची मागणी आहेअसेही ते म्हणाले. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण यंत्रणा 14 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यास तत्पर असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

            मनपा क्षेत्रातील शाळा मात्र डिसेंबर अखेरीस सुरू करण्यात येतील,अशी माहिती यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा एक जानेवारीपासून नागपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील शाळा देखील सुरू होतीलअसे संकेत त्यांनी यावेळी दिले.

            नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या मोठ्याप्रमाणात तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात 2961 प्राथमिक शाळा आहे. 1250 माध्यमिक शाळा आहेत. मनपा क्षेत्रांमध्ये जवळपास 593 शाळा आहेत.

            ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये लक्ष 34 हजार 527 विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत.तर शहरी शाळांमध्ये जवळपास लक्ष 42 हजार 220 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे हे सर्व विद्यार्थी सध्या शाळेपासून दूर आहेत.

*****

No comments:

Post a Comment