Tuesday, 8 December 2020

 जिल्हा परिषदेकडून 67 अनुकंपाधारकांची पदभरती

         नागपूर, दि. 8 : जिल्हा परिषदेकडून 67 अनुकंपाधारक उमेदवारांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नुकतीच पूर्ण करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. 

            निवड झालेल्या उमेदवारांमध्ये कनिष्ठ सहाय्यक 31, वरिष्ठ सहाय्यक 4, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 5, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 2, कंत्राटी ग्रामसेवक 13, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 5, अंगणवाडी पर्यवेक्षिका 3, आरोग्य सेवक (पुरुष) 3 आणि औषध निर्माण अधिकारी 2 अशा एकूण 67 पदांचा समावेश आहे. 

            अनुकंपा उमेदवारांची प्रस्तावित निवड यादी प्रतीक्षा यादीनुसार व त्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केली. तसेच ती यादी  जिल्हा परिषदेच्या सूचना फलक आणि संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. उमेदवारांचे आक्षेप 29 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याकडे  लेखी स्वरुपात मागविण्यात आले होते. 

            आबासाहेब खेडकर सभागृहात सोमवार, दिनांक 7 डिसेंबर रोजी पदस्थापनेची प्रक्रिया राबविण्यात आल्याचे श्री. कुंभेजकर यांनी सांगितले. ही संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, विभागाने प्राधान्याने पदे भरणे आवश्यक अशा ठिकाणी अनुकंपाधारक उमेदवारांच्या पसंतीनुसार ही पद स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. 

******

                           

 

No comments:

Post a Comment