Saturday, 5 December 2020

  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी

-         जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

·         आज विशेष मोहिमेत करा नावनोंदणी

नागपूर दि. 5: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या जिल्ह्यातील युवक-युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा
धिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी उद्या रविवार दिनांक 6 डिसेंबर 2020 व शनिवार, दिनांक 12 डिसेंबर आणि रविवार दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी आहे. या विशेष नावनोंदणी मोहिमेंतर्गंत 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 15 डिसेंबर 2020 रोजी दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे.

या कालावधीत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले असून, 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यांदीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने वयाची  18 वर्षे पूर्ण करणा-या युवक-युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी   केले आहे.  

 ******

No comments:

Post a Comment