जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर, दि. 8 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी
श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, इंडियन मेडिकल
असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी आदी मान्यवरांनी यावेळी श्री. जगनाडे महाराज
यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment