Tuesday, 12 January 2021

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

  


                नागपूर, दि. 12: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अकरावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर शिष्यवृत्ती योजना जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.  शालांत परक्षेत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-21 साठी ऑनलाईन महाडिबीटी प्रणाली http://mahadbtmahait.gov.in वर अर्ज स्वीकारणे सुरु आहे. नागपूर जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयाची नावे या संकेतस्थळावर दिलेली असून  शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी आता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत होती.

            संबंधित माध्यमिक शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी महाविद्यालयातील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचे अर्ज पोहचविण्यासाठी  व भरण्यासाठी चौकशी करावयाची असल्यास जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके यांनी केले आहे.

                                                                    *****    

No comments:

Post a Comment