खासगीरित्या
दहावी-बारावी प्रमाणपत्र परीक्षा
शुल्कासह
आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा जाहीर
नागपूर, दि. 25 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2021
दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या खाजगीरित्या
विद्यार्थ्यांचे नावनोंदणी प्रमाणपत्रासाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज 25
जानेवारीपर्यंत सादर करण्यासाठी कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने परीक्षेस पात्र
विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्रांबाबत मोबाईल किंवा ईमेलवर संदेश उपलब्ध
होतील, त्यांनी स्वत:चे
नावनोंदणी प्रमाणपत्र मंडळाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावीत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाने कळविले आहे.
नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या खासगी विद्यार्थ्यांची सन 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व
बारावी परीक्षेची आवेदनपत्रे नियमित शुल्काने ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in संकेतस्थळावर
भरावयाची आहेत. ही आवेदनपत्रे नियमित शुल्कासह मंगळवार,
दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत भरावयाची आहेत. तर विलंब शुल्कासह 3 फेब्रुवारी ते 13
फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहेत.
खासगी विद्यार्थी परीक्षा आवेदनपत्रांचे शुल्क माध्यमिक शाळा व
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ
महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन बँकेत चलनाद्वारे 27
जानेवारीपासून गुरुवार, दिनांक 18 फेब्रुवारीपर्यंत भरावयाची असल्याचे नागपूर विभागीय मंडळाच्या सचिव
माधुरी सावरकर यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment