भंडारा येथे आज भेट देणार
नागपूर, दि. 12 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 12 ते 17 जानेवारी दरम्यान नागपूर-भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज
सायंकाळी पाचला नागपूर विमानतळावर त्यांचे
आगमन झाले. उद्या सकाळी ते साडेनऊला भंडारा जिल्हा सामान्य
रुग्णालयाला भेट देतील.
महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव
कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त
राधाकृष्णन बी, नागपूर महानगर प्रदेश
विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) महानगर आयुक्त शीतल तेली-उगले, नागपूर शहर अतिरिक्त पोलीस
आयुक्त डॉ. दिलीप झळके, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा
अधिकारी यशवंतराव सराटकर आदी विमानतळावर उपस्थित होते.
शनिवारी सकाळी साडेदहाला राज्यपाल नागपूर राजभवन
येथून सक्षम-2021 या तेल आणि नैसर्गिक वायू
संवर्धन उपक्रम या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित असतील. दुपारी बाराला ते दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला भेट
देणार आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास दीक्षाभूमी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेला भेट देतील. सायंकाळी पाचला राजभवन येथे आयोजित कोरोना
योद्धा कार्यक्रमात ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार आहेत.
रविवार, 17 जानेवारी दहाला नागपूर महानगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन
प्रकल्पाला भेट देतील. त्यानंतर सकाळी अकराला बायो मायनिंग प्रोजेक्ट
भांडेवाडीला
भेट देतील. रविवारी पावणेपाचला ते मुंबईसाठी प्रस्थान करतील.
*****
No comments:
Post a Comment