Tuesday, 16 February 2021
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020
प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.15 फेबुवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
0000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment