Friday, 26 February 2021
दुचाकी वाहनांसाठी एमएच-49-बीक्यू मालिका 2 मार्चपासून
नागपूर, दि. २६: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एमएच-49-बीपी ही दुचाकी वाहनासाठी असलेली नोंदणी क्रमांकाची मालिका संपत आल्यामुळे आता दुचाकी वाहनासाठी एमएच-49-बीक्यू ही नवीन मालिका दिनांक 2 मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करायचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठी उप प्रादेशिक कार्यालय (पूर्व), नागपूर यांच्या नावे काढलेल्या फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहित दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या कालावधीत या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे
एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी वाहन मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक वा पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता येईल व अशा अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल.
आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित वाहनधारकांनी स्वत: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, (पूर्व) डिप्टी सिग्नल, नागपूर येथे अर्ज करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (पूर्व) यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment