Thursday, 11 February 2021
रस्ता सुरक्षाविषयक विशेष कार्यक्रम रविवारी
नागपूर, दि. 11 : रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 17 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा विषयक विशेष कार्यक्रम रविवार, 14 फेब्रुवारीला होणार असून अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह, येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास पालकमंत्री नितीन राऊत, गृह मंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, विधान परिषद सदस्य नागो गाणार, गिरीष व्यास, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य अभियंता संजय दशपुते, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, रेल्वे महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment