Tuesday, 23 February 2021
माजी सैनिकांसाठी रोजगाराची संधी
नागपूर, दि.23 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील माजी सैनिक विश्रामगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर यांचेसाठी माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात एक अशासकीय विश्रामगृह पहारेकरी रुपये नऊ हजार नऊशे दोन या एकत्रित मानधनावर 175 दिवसांसाठी कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे.
इच्छुक माजी सैनिकांनी सैन्य सेवेतील मूळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment