Thursday, 11 March 2021
सार्वजनिक सुटीच्या दिवशी आरटीओ कार्यालये सुरु
नागपूर दि. 11 : शासकीय महसुलामध्ये वाढ व आर्थिक वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहन खरेदीला चालना देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मार्च महिन्यातील 31 तारखेपर्यंतच्या सर्व सार्वजनिक सुटीच्या काळात कार्यालये सुरु ठेवली आहेत. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळविणे, वाहनांचा ताबा मिळविणे व यासंदर्भातील अनुषंगिक कामे नागरिकांनी सुटीच्या दिवशीदेखील करुन घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment